Wednesday, January 8, 2020

मनसेच्या झेंड्यावर राजमुद्रा विरोधकांकढून पसरवला जातोय चुकीचा संदेश

महाराष्ट्र नवनिर्माण सेना या पक्षाच्या झेंड्यावर राजमुद्रा वापरणार आहे असा एक चुकीचा संदेश सोशल मीडियावर फिरत आहे. पक्षा कढुन कुठल्याही प्रकारची अधिकृत घोषणा नसताना विरोधकांना नवीन मुद्दा हाती भेटल्याचे दिसत आहे. मुळात नुकताच वायरल झालेला झेंड्याचा फोटो हा शिवजयंती दिवशी होणाऱ्या रॅली मध्ये वापरला जातो. याचा पक्षीय राजकारणाशी कुठलाही संबंध नाही आहे. हल्लीच झालेल्या विधानसभा निवडणुकीत सुद्धा हा झेंडा कुठेही दिसण्यात आला नाही परंतु मनसे पक्षाचा झेंडा बदलणार असे समजताच शिवजयंती दिवशी वापरल्या जाणाऱ्या या झेंड्याला नवीन मुद्दा बनवण्याचं काम विरोधक करताना दिसत आहेत. येत्या २३ जानेवारीला मनसेच पहिलं अधिवेशन मुंबई येथे होणार आहे. मनसे अध्यक्ष तिथे पक्षा संदर्भात आपली भूमिका मांडताना दिसणार आहेत.

No comments:

Post a Comment