Monday, November 25, 2019

अजित पवार यांचा व्हिप अंतिम

राष्ट्रवादी आणि भाजप याचे सरकार स्थापन झालेले आहे. अजित पवार हे अजूनही राष्ट्रवादीचे गटनेते आहेत आणि त्यांनी दिलेला व्हिप सर्व आमदारांसाठी बंधनकारक असेल. त्यांनी सांगितल्यानुसारच आमदारांना मतदान करावे लागेल', असा दावा भाजप नेते आणि केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी केला.
ज्या कपिल सिब्बल यांनी भगवान श्रीराम काल्पनिक आहेत, त्यांचे मंदिर बांधू नये, असे म्हटले होते. त्यांच्यावर संजय राऊत यांनी 'सामना'मध्ये अग्रलेख लिहिला होता, तेच सिब्बल आता शिवसेनेचे वकील आहेत, अशी टीका रावसाहेब दानवे यांनी केली. शेतकरी अडचणीत असताना भाजप आमदार शेतकऱ्याच्या बांधावर आहेत. मात्र शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे आमदार मात्र पंचतारांकित हॉटेलमध्ये मजा मारत आहेत, असेही दानवे म्हणाले.

Sunday, November 3, 2019

राज ठाकरे आणि शरद पवार यांच्या भेटीमुळे राजकीय वर्तुळात चर्चा


महाराष्ट्र  नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राष्ट्रवादी कांग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली.
अचानकपणे झालेल्या या भेटीमुळे राजकीय वर्तुळात याची चर्चा जोरदार सुरु आहे. लोकसभा २०१९ निवडणुकी नंतर शरद पवार अणि राज ठाकरे यांचे चांगले संबंध पहायला भेटले आहेत. नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत अनेक ठिकाणी राष्ट्रवादीचा मनसेला तर मनसेचा राष्ट्रवादीला छुपा तर काही ठिकाणी उघड़ पाठींबा दिसण्यात येत होता. भाजप आणि शिवसेना यांच्या सध्याच्या घौड़दौड़ मध्ये ही भेट आणि या भेटीत राज ठाकरे आणि शरद पवार यांच्यात काय चर्चा झाली असेल शिवसेनाला पाठींबा यावर की दिवाळी निमित्त  भेट हे काय सांगता येल असे दिसत नाही. भाजपचा पराभव करण्यासाठी विरोधी पक्ष एकत्र असणं आवश्यक आहे, असं पवार आणि राज ठाकरे यांना वाटतेय. त्यामुळे पुढील निवडणुकांच्या  दृष्टीने मतदारसंघातील मतांच्या आकडेवारीसह पवार आणि ठाकरे यांच्यात चर्चा होणार आहे अस दिसत आहे 
विधानसभा निवडणुकीत शरद पवार आणि राज ठाकरेंनी एकमेकांना सहकार्य करण्याची भूमिका घेतली होती. . त्याचा परिणाम निकालात दिसून आला. राष्ट्रवादीच्या काही उमेदवारांच्या विजयाला मनसेच्या मदतीचा हातभार लागला. तर मुंबईत 10 मतदारसंघात मनसेला दुसऱ्या क्रमांकाची मते मिळाली आहेत. याशिवाय कल्याण-डोंबिवली आणि नवी मुंबईतही मनसेची कामगिरी चांगली राहिली.

TDV News Is Back again with blogger

We Happy to announced that we are back with more news and great content. After Youtube we back here. thanks to giving us support. we 67000+ on youtube. now its blogger time.