Sunday, November 3, 2019

राज ठाकरे आणि शरद पवार यांच्या भेटीमुळे राजकीय वर्तुळात चर्चा


महाराष्ट्र  नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राष्ट्रवादी कांग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली.
अचानकपणे झालेल्या या भेटीमुळे राजकीय वर्तुळात याची चर्चा जोरदार सुरु आहे. लोकसभा २०१९ निवडणुकी नंतर शरद पवार अणि राज ठाकरे यांचे चांगले संबंध पहायला भेटले आहेत. नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत अनेक ठिकाणी राष्ट्रवादीचा मनसेला तर मनसेचा राष्ट्रवादीला छुपा तर काही ठिकाणी उघड़ पाठींबा दिसण्यात येत होता. भाजप आणि शिवसेना यांच्या सध्याच्या घौड़दौड़ मध्ये ही भेट आणि या भेटीत राज ठाकरे आणि शरद पवार यांच्यात काय चर्चा झाली असेल शिवसेनाला पाठींबा यावर की दिवाळी निमित्त  भेट हे काय सांगता येल असे दिसत नाही. भाजपचा पराभव करण्यासाठी विरोधी पक्ष एकत्र असणं आवश्यक आहे, असं पवार आणि राज ठाकरे यांना वाटतेय. त्यामुळे पुढील निवडणुकांच्या  दृष्टीने मतदारसंघातील मतांच्या आकडेवारीसह पवार आणि ठाकरे यांच्यात चर्चा होणार आहे अस दिसत आहे 
विधानसभा निवडणुकीत शरद पवार आणि राज ठाकरेंनी एकमेकांना सहकार्य करण्याची भूमिका घेतली होती. . त्याचा परिणाम निकालात दिसून आला. राष्ट्रवादीच्या काही उमेदवारांच्या विजयाला मनसेच्या मदतीचा हातभार लागला. तर मुंबईत 10 मतदारसंघात मनसेला दुसऱ्या क्रमांकाची मते मिळाली आहेत. याशिवाय कल्याण-डोंबिवली आणि नवी मुंबईतही मनसेची कामगिरी चांगली राहिली.

No comments:

Post a Comment